मैलाचा दगड
काल संध्याकाळी अचानक गौरीने हट्टच धरला , चल ना आई...आपण Stone, Paper, Scissor खेळूया... मी माझ्या ऑफिसच्या कामात व्यस्त होते... पण आणखीन त्रास नको म्हणून मी पटकन तिला हो म्हटलं. ती game explain करायला लागली....आणि लगेच मला खेळण्याचे नियमही सांगायला लागली...
This is a hand game usually played between two people, in which each player simultaneously forms one of three shapes with an outstretched hand. These shapes are Stone or "rock" (a closed fist), "paper" (a flat hand), and "scissors" (a fist with the index finger and middle finger extended, forming a V).
नियम:
1. Rock crushes Scissor 2. Paper covers Rock 3.Scissors cuts Paper.
ती एकदम mood मध्ये येऊन खेळत होती...माझे मात्र सारे लक्ष माझ्या Income Tax filing च्या कामामध्ये होते
गेले 2 महिने, निर्णायक cricket match खेळावी असे अगदी घराचे वातावरण झालेले होते... 2 ओव्हर आणि 50 रन्स... तरीही खेळणे चालूच होते...
Challenge Accepted अशाच पवित्राने कामे हातावेगळी होत होती...Income Tax e filing chi due date 31st July होती...प्रत्येकाला IT dept चा ह्यावेळेसचा Penalty clause माहीत असल्यामुळे ज्याला त्याला स्वतःचे IT returns priority ने करावे असेच वाटत होते त्यामुळे tremendous pressure येत होतेच... त्यात थोडा दिलासा म्हणून 3-4 दिवस आधीच Income Tax चे circular आलेच की Due Date has been extended to 31st Aug 2018...
पण सर्वांचाच हा अनुभव आहे की आपण सारी माणसे आजचे काम उद्यावर ढकलतो... त्यामुळे बघता बघता ही 31st Aug date सुद्धा उद्यावर येऊन ठेपली की ह्याची जाणीव झाली.
त्यामुळे मुलीच्या खेळात माझे बिलकुल लक्ष नव्हते.
Clients चे phones चालूच होते... कुणी form 16 email केला आहे, हे सांगत होते... कुणी Deductions चे documents पाठवतो हे सांगत होते... तर कुणी Bank Details...Gumasta Certificate, Pan, Aaddhar, GST ह्याचे updates देत होते... माझ्या मुलीला सुद्धा एव्हाना जवळ जवळ दोन महिने ह्या वातावरणाची सवय झाली होती...पण त्याच्यातही तिची माझ्याबरोबर खेळण्याची जिद्द जबरदस्त होती...
प्रत्येक डाव ती जिंकत होती आणि मला हसत होती ... एरवी अभासाच्या बाबतीत आढे वेढे घेणारी ती खेळात मात्र एकदम लक्ष देऊन मला टार्गेट देत होती... आणि मी हाताने कोणताही shape घ्यायच्या आत ती मला हरवत होती... 10 विरुद्ध 2 अशी बाजी तिने मारली देखील....
मी पाहतच राहिले...
पुन्हा एकदा माझ्या कामात मी व्यस्त झाले.. पण डोक्यातुन तो game काही निघत नव्हता...
खरोखर हा गेम आणि IT returns ची Due date filing करायचे challange अगदी सहजपणे relate होत होते...
🤭
Due Date = Stone/Rock = मैलाचा दगड
Income Tax Return Filing Acknowledgement = Paper ⬜
Penalty = Scissor ✂
1.जर Due Date च्या आत IT returns file झाले तर Paper ने stone ला मुठठीत ठेवले.
2. जर उद्याची 31st Aug 2018 ही Due Date ही cross केली तर penalty नक्की... म्हणजे आपल्या खिशाला (Paper ला)कात्री लागलीच समजा penalty ची...
3. आणि Due Date (Stone) नक्कीच पुन्हा वाढेल ह्या स्वप्नवत गोष्टीत अडकलात तरीही कात्री नक्कीच...
म्हणजेच शेवटी हा game आपल्या सर्वांना मोलाचा संदेश नक्की देऊन गेला...
वेळेच्या आत आपणही आपापले Income Tax Returns भरूया आणि आयुष्य सुगम, सफल करूया.
|
Comments
Post a Comment