CHILD PSYCHOLOGY बद्द्ल काही...



 
आज T.V वर तारे जमीन पर पिक्चर चालू होता, आम्ही सर्व कुटूंबिय तो पाह्ण्यात खूप दंग होऊन गेलो होतो. हा पिक्चर एकदा सूरू झाला की मग संपे पर्यंत तो बघावासा वाटतो. याला कारण ही तसेच, ...child psychology हा विषय माझा नेहमीच आवडता ! हा पिक्चर ज्या विषयावर आहे तो विषय खूपच Deep आणि अंतर्मुख करणारा आहे.

     ह्या संदर्भातील एक प्रसंग मला अजूनही आठवतो. माझी मुलगी तेव्हा जुनिअर केजी मधे होती. तिला शाळेत Drop करताना अचानक माझी नजर तेथील काम करत असलेल्या मावशींवर पडली. मला पाहून ती एकदम लाजली , ओशाळली.. मलाही तिला कुठेतरी पाहिल्यासारखे वाटले. ती तेथून निघतानाच मी हाक मारली अगं तू......... ना ! आपण एकत्र शाळेत होतो , तिनेही मला ओळखलं पण ती नजर देत नव्हती. मी तिच्या खांदयावर हात ठेवला तेव्हा ती एकदम जवळ आली आणि म्हणाली अगं तू मला ओळखलस ! मी तिला म्हटले, मी का नाही ओळखणार तुला! तू किती छान डबा आणायचीस. मला तर तुझ्या डब्यातले नेहमीच आवडायचे. मग ती आनंदाने म्हणाली अग ह्या बालमंदीरासाठी सुद्धा मी जेवण बनवते ! मी तिला बोलले , बघितलस ! तुला ज्याच्यात रुचि आहे तिथे परमेश्वराने तुला आणलेच ना ! तिने होकारार्थी मान हालवली. पुढे बायबाय करुन मीही माझ्या कामासाठी निघाले.

    हि मुलगी का लाजली पहिल्यांदा बघून? त्याला कारणही तसेच होते ! ती सतत नापास व्हायची ! माझ्या मोठ्या बहिणीच्या वर्गातही असायची पुढे मी जेव्हा त्या वर्गात जायची तेव्हाही ती त्याच वर्गात असायची , सर्व शिक्षकांची ती नावडती ! तिला सर्वजण ’ढ’ म्हणूनच बोलायचे. त्या वेळेस ( right to pass act वगैरे काही अस्तित्वात नव्हता.) त्यामुळे ती एकेका इयत्तेत २-३ वर्ष काढूनच पुढे जायची. पूर्वी असे जे शिक्षणात बरे नसायचे त्यांचे हाल काही भयानकच असायचे ! त्या मुलीचा problem कधी कुणी लक्षात घेतला नसेल का?
जसे "तारे जमीन पर" ह्या चित्रपटात इशान अवस्थीची गत तसेच काहीसे असेल का ? ...ना शिक्षक ना पालक ना समाज accept करत ह्या मुलांना पण म्हणून काही ही मुले वाया जातात का ? मुळीच नाही...  कुणी शालेय शिक्षणात विशेष प्राविण्य मिळवले नसले तरी त्यांच्या त्यांच्या skill नुसार व परमेश्वरी योजनेनुसार प्रत्येकाला आपले क्षेत्र गवसतेच !

    ह्या field मध्ये मला आवड असल्यामुळे छोटी छोटी व्याख्याने अटेंड करत होते , पुस्तके वाचतच होते. प्रसिद्ध Psychiatrist श्री मनोज भाटवडेकर यांचे पुस्तक "आपलं मूल यात तर नाही ना !"  हे वाचण्यात आले. छोट्या छोट्या केस स्ट्डीज मधुन तमाम पालक आणि शिक्षक वर्गाला विचार करणारे, अंतर्मुख करणारे हे पुस्तक वाचून स्वत:च्या शाळेतले अनेक प्रसंग आठवत होते.
येथे आणखीन एका वर्गमित्राची आठवण आल्याशिवाय राहात नाही. हा शाळेत काहीही लिहू शकायचा नाही. एखाद्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा confidence ही त्याच्याकडे नसायचा. भर वर्गात मुलेही ह्सायची आणि शिक्षकही हा गाढव, हा उगीच वाढला असे शेरे मारायचे ! पण ह्या मुलाबद्दल एक गम्मत म्हणजे पुढे हा एक Successful Business Man झाला. त्याच्या बाबतीत शाळेत घडणार्‍या सर्व प्रसंगांवरुन तो आयुष्यात काहीही करु शकणार नाही हेच सिद्ध होत होते. पण आज मुंबई सारख्या शहरात तो दुकान थाटुन बसला आहे.

   बालकविकास ह्या  विषय गोडी निर्माण झाल्यामुळे "Introduction to the Learning Disabilities" rather Learning Difficulties ह्या विषयाचा Short Course करण्याची संधी मिळाली. अतिशय आगळे वेगळे विेषय, अनेक Faculties, त्यांचे मार्गदर्शन ह्या कोर्स मुळे मिळाले.
 "Learning Disabilites" means Dyslexia हा मोठा गैरसमज दूर झाला. Dyslexia हा त्यातील एक भाग आहे.

आपण पुढच्या लेखात याविषयी नक्की जाणुन घेवुया.
भेटूया लवकरच !










 






Comments

  1. Ambadnya 🙏
    Naathsamvidh 🙏

    ReplyDelete
  2. अक्षतावीरा आपण खूपच छान रीत्या पालकांना मुलांची मानसिकता जाणून घेणे किती महत्त्वाचे आहे हे आपल्या लेखातून सांगितले आहे काहीवेळा मुलांना अभ्यासात तितकी आवड नसते वा काही कारणास्तव त्यांची प्रगती म्हणावी तशी होत नाही तेव्हा पालक मुलांना एकतर विचित्र वागणूक देतात त्यांचा राग राग करतात. आपला लेख नक्कीच ह्या समस्येवर त्यांना मार्गदर्शन करेल. पुढील लेखाची आतुरतेने वाट पहात आहे

    ReplyDelete
  3. Too good Akshata. Reminded me of many things, like when I was watching this movie tears were rolling down my cheeks continously, cause one of my close fellow sufferrred this, may be (this is what I understand now). We all as elders used to look down on him. He is very successful person now, but I am sure, the scars of our thoughts about him would still be fresh in him. I really regret about my thoughts then (regarding studies). This movie made me learn a lot....

    ReplyDelete
  4. Thank you Maheshsinh, Sunita Karande and Pallavi Taishete for feedback..Next article is in progress will share soon.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

Form 16......Know More

E - Filing Need of the Hour